Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत ( Dk ) यांच्या लेखणीतून..

 नमस्कार 🙏 जय महाराष्ट्र 🚩

ग्रामपंचायत विशेष कारभार











थोडक्यात ग्रामपंचायत बद्दल काही वेगळ्या गोष्टी सांगण्याचा मी 

प्रयत्न करतोय... या गोष्टी काही वेगळ्या नाहीत पण, आपल्या गावातील काही शिक्षित लोकांना यांचा अभ्यास आहे पण, ते शिक्षित लोक अनपढ लोकांना सांगत नाहीत, किंवा ग्रामपंचायत मध्ये आवाज उठवत नाहीत, आपल्या तरुणपिढीची हीच मोठी शोकांतिका आहे, असं मला वाटतंय...तर थोडक्यात सांगायचं म्हणजे माझा परिचय जवळजवळ सर्व वाचकांना माहित आहे..तरी पण सांगतो मी करडखेल गावचाच एक नागरिक आहे,माझं नावं दयानंद रामचंद्र कसबे ( Dk ) गेल्या काही बऱ्याच दिवसापासून आपल्या गावचा विकास हा 0 आहे. असं मला वाटतय नाही तर ते सर्व गावातील लहानथोर मंडळींना माहीतच आहे, गावात कोणतीच शासनाची सुविधा राबत नाही.. ना वेळेवर पाणीपुरवठा होतं नाही.ना स्वच्छ शुद्ध पाणी पिण्यासाठी नाही,, आपल्या गावामध्ये सर्व जनतेला पाणी पिण्यासाठी शुद्ध भेटावं व ते जनता निरोगी रहावी, हे फक्त कागदपत्रे बोलायचं आणि साक्षात बगण्यास आलो तर, आमच्या गावात फक्त पाणी फिल्टर मशीन तर बसवलेत पण कित्येक दिवस झालं त्यात पाण्याचा एक थेंबही नाही? 

प्रत्येक गावची अवस्था नाही फक्त करडखेल गावचं दिसेल?

पाण्याची दुरावस्था, रस्त्याची दुरावस्था बाकीच्या काही गोष्टी दूरच पण हे लोक नावापुरते ग्रामपंचायत ला एक नामधारी म्हणून काम करत असतात... 

याच उत्तम उदाहरण म्हणजे करडखेल गावं दिसेल तुम्हाला.. 

तर एक वर्षाचा किस्सा सांगतो.. फक्त एक वर्षाचा बरं का लक्षात असू द्या... मग आजवर काय कारभार झाला असेल ते तुम्ही स्वतः विचार करा...

ग्रामपंचायत ला एक वर्षाला एक्या बाजूचा येणारा निधी..

* 15 व्या वित्त आयोगानुसार गावातील एका व्यक्तीला प्रत्येक वर्षाला 957 रूपये मिळतात...

तरी त्यामधून 50% पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासाठी वापरला गेला.. आणि उर्वरित इतर कामासाठी वापरला गेला तर बाकीचा खर्च गेला कुठं...

तर आपल्या गावची लोखसंख्या किती आहे अन काय आहे हे तुम्हाला माहित आहे.. तर एका व्यक्तीला 957 रूपये एक वर्षाला शासन देत, तर पाच वर्षाची बेरीज करून बगा.... काय उत्तर येईल?


मग याच उत्तर आपणाला कधीच भेटलं नाही..

असे बरेच आणि अगणित प्रश्न आहेत, ते ग्रामपंचायत आपणाला उत्तर दिले नाही...

माझं एकच सांगणे आहे.. की बाबांनो थोडंसं ग्रामपंचायत चा अभ्यास करा...गावं सुधारण्यासाठी ग्रामपंचायत कमिटी ला जाब विचारा....

आपल्या प्रत्येक समाजाचा समशान भूमी रस्ता प्रश्न अध्याप सुटला नाही... वर्षानुवर्षे हेच चालत येतं आहे...

दुसऱ्या गावच्या सुविधा बघितलात तर आपणाला आपल्या गावचं नावं घेण्यासाठी लाज वाटतं आहे...

येणाऱ्या ग्रामपंचायत च्या काळात फक्त तरुणाईतला तरुण जागरूक झाला पाहिजे.. आणि प्रत्येक समाजातला विकास म्हणजे गावचा विकास हे धोरण राबविल पाहिजे...



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ