सप्रेम जय लहुजी
डॉ. साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.या महामानवास प्रथमतः अभिवादन करतो व माझ्या छोट्याश्या लेखणीतून अण्णाभाऊ साठे यांचा माझा रशियाचा प्रवास आणि रशियातील अण्णाभाऊची झालेली भ्रमंती माझ्या शब्दात वर्णन करत आहे. 😊
मी रशियात जाण्यापूर्वी माझी चित्रा ही कादंबरी रशियेन भाषेत प्रकाशित झाली. आणि काही कथांचा अनुवादही झाला. तर अण्णाभाऊची सुलतान कथाही लोकांना फारच आवडली. 'सुलतान '
मला अमरावतीच्या मध्यवर्ती तुरुंगात भेटला होता. तो माझ्या अगोदर कथारूपाने रशियात पोहचला होता. त्यामुळं सुलतान फेम अण्णाभाऊ साठे माझ्याबद्दलचा मजकूर छानपताना लिहला जायचा.
अण्णाभाऊचा 'स्टालिनग्राड ' नावाचा पोवाडा रशियात फारच लोकप्रिय झाला होता. आणि हे सर्व पुण्य पदरी घेऊन अण्णा रशियात भ्रमन करत होते..
अण्णांनी पहिल्या दोन दिवसातच ओहक =पाणी, पिचस्की =आगपेटी, खराश = खरे आहे, हे शब्द त्यांनी शिकले.. 😊
ज्या वेळी अण्णा मास्को शहरात पोहचले आणि त्यांच्यपुढ नवीन पेच पडला. दोन डॉक्टर, एक आमदार, एक सॉलिस्टर, एक पियानोवादक नि एक लेखक म्हणजे स्वतः अण्णा अशा सहा लोकात पाच आवडी उभ्या राहिल्या आणि आम्ही त्यांचा विचार करू लागलो.. जो ते आपलं मत पुढे रेटू लागला..
डॉक्टर लोकांचा शहाणपणा.., 🏥
दोन डॉक्टर काखा वर करून सरळ म्हणाले ''रशियात जेवढी म्हणून शास्त्रक्रिया होणार आहे.. ती आम्ही पाहिलीच पाहिजे. नाहीतर रशियात येऊन आमचा काय फायदा.?
या दोन डॉक्टरपैकी एक हैद्राबादचे शहा हे स्वतः आजारी होते. आणि स्वतःच्या शरीरावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आले होते..
दुसरं डॉक्टर दयाळू हे म्हैसूरी ग्रहस्थ होते. त्यांना हिंदि भाषा तर मुळीच येत नव्हती.
लखनऊचे आमदार पुष्कराज नाकीडोळी तरतरीत तंदुरुस्त होते.. तशाच त्यांचा पोशाखही नीटणीटका म्हणजे नेहरू टाईप होता..
ते अण्णा भाऊला म्हणाले रशियात लोकशाही आहे का..?
याची सखोल चौकशी करायची आहे. आपण कायदे मंडळाचे कामकाज पाहणार आहोत..
कुत्र्याची चिरफड पाहून थोडंच आमचं पोट भरणार आहे एवढं बोलून ते थांबले पण ते खाटीक नाहीत अशातला शब्द ओसारडा आला..
नंतर कळक्त्याचे सालिस्टर श्री चेतर्जी पुढे आले कलकत्याचा उच्चार करताना ' कु करत म्हणजे सरळ कलकुता करत. ते म्हणाले मला कुत्र्याचे ऑपरेशन नको आणि माझा जो पेक्षा आहे तोच मला हवा आहे. मी या रशियामध्ये न्यायदान पद्धत पाहणार आहे. रशिया हा अन्यायाचा राज्य आहे. असं मी फार म्हणजे फारच ऐकलं आहे. तेव्हा मला कोर्टात घेऊन चला..
यानंतर मद्रासचे जॉन उठले या जॉनच्या डोळ्याच्या पापन्या सारख्या उघडझाप करू लागले कि हसू लागले.. डोळ्यात पाणी येई आणि म्हणू लागले मी कलावंत आहे. मी पियानोवादक आहे. मला कुत्र्याचे ऑपेरेशन पाहायची अजिबात इच्छा नाही.. कारण माझी पत्नी एक चांगली डॉक्टर आहे.
मी आपला पियानी ऐकणार तुम्ही काहीही करा., 🙏
शेवटी अण्णांची पाळी आली अण्णा म्हणाले '' मला या देशात फुटपाथन भटकंती करायची आहे.हे अण्णांचे शब्द ऐकून सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले..
अखेर असं ठरलं कि ज्याला जे आवडेल ते करेल..
दुसऱ्या दिवशी अण्णाला भारतीय दूत आवासाचे निमंत्रण आले तिकडे आम्ही वेळेवर पोहोचलो. परंतु युवक प्रतिनिधी अजून येणार होते.
अण्णा दारातच फुटपाथवर थांबले माझ्या पुढ रस्तादुरुस्तीच काम चालू होतं. अवघी पाच माणसं ते काम करत होते. पाच माणसं नि मोटार एवढीच उकरण्याचं भरण्याची काहीच साधन त्याकडे नव्हती फक्त काम म्हणून काम करायच का तुम्ही असा सवाल अण्णा भाऊंनी केला... बाकीचं कामगार सुटबूट घालून फक्त कामाची देखरेख करित होती.. आमच्याकडे बडे नेत्याचा थाट जसा इथल्या कामगार लोकांचा तिथं कामाची सक्ती नव्हती परंतु., यंत्रचं त्या माणसाचं गुलाम होऊन काम करायचे..
प्रत्येक शब्द माणसाचे बोलणे वागणे सर्व गोष्टीचा अण्णा ला अंधकार दिसू लागला.. पण काय करणार त्याला विलाज नव्हता.
भारतीय दूत निवासात गेल्यावर मला भारतीय लोकांचं बोलणं आठवलं.. आणि माझं मन भारतीय जीवनाकडे वळलं भारतीय संस्कृतीन बाहरलं आणि घरची आठवण आली...
डोळ्यात झटकन पाणी आलं असं काय डोंगर फुटावा तस माझा हम्बरडा फुटला.. जिना चडून जाताच महात्मा गांधी आणि पंतप्रधान नेहरू यांच्या प्रतिमानच दर्शन झालं.
आणि मुख दालनात जाताच आपण मासकोत नसून दिल्लीत मुंबईत कुठं तरी आहोत आपल्या देशात आहोत असं वाटलं..


0 टिप्पणियाँ