🚩जय महाराष्ट्र 🚩
समाधान म्हणजे काय हेच माहित नसेल तर, गावच्या नावाखाली वेड्याची जत्रा भरवून काहीच अर्थ नाही हो प्रशासकीय साहेब ना तुम्ही, चार लोक बोलवलात चार लोकांचे विकास या मुद्यावर त्यांनी बोले, उदाहरणं पण दिले, पण त्या 5 तासाच्या समाधान शिबिरात आमच्या गावचं नावं उदाहरणात नव्हतंच हो, याची थोडीशी खंतच वाटली बगा, करडखेल गावातच समाधान शिबीर झालं, थाडेफार काही वाटपाचा कार्यक्रम पार पडला, घरकुल, दिव्यांग, आपले सरकार केंद्र आणि दुसरे काही अशा मोजक्या कार्यक्रमांची रूपरेषा म्हणायला काही अवग नाही..?
खरंच करडखेल गावचा नागरिक समाधान आहे का हो..?
तर मलाच नाही तर गावातल्या 6 वर्षाच्या मुलाला जर हा प्रश्न केला ना तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं येईल... हे कडवट सत्य आहे..
आमचे छोटे बंधू गुणवंत कसबे यांनी आपल्या शैलीतून काही गावचे विकासाचे मुद्दे ग्रुपला टाकले.. पण त्यावर कुणाची प्रतिक्रिया आली नाही हीच सर्वात मोठी शोकांतिका आपल्या तरुण वर्गाची...
गुणवंत ने बराच उलगडा केला विकासनिधी कामाचा पण त्यावर कोणी लक्ष दिल नाही...
🫡समाधान शिबिरात जे काही मोठमोठ्या गोष्टीचा उल्लेख केला, मुख्य गोष्ट पानंद रस्त्याची केली गेली...😄
🤓अहो साहेब त्या रस्त्याला एकदा तरी तुम्ही आलात का..?
जसं खडक आणि माती शिपडून गेलात तसं एकदा तरी गावच्या पानंद रस्त्याने आपला पायी प्रवास झाला आहे का..😄
का मोटारसायकेलीने जाऊन तुम्ही त्या रस्त्याची दुरावस्था बघितली का..? 🛵
साहेब तुम्ही आमच्या गावात प्रत्येक समाजात कधीच फेरफटका मारलात का हो..? 🚶♂️
आम्ही जे पाणी पितो ते पाणी तुम्ही पिलात का हो..🥛का
समाधान शिबिरात आले होती जी मोठंमोठी माणसे त्यांना पिण्यास दिलात... ते कस पिणार...? 😡
आम्ही जिथे रहातो तिथे काय अडचण आहे हे कधी विचारलात का हो..? ☹️
बरं आपणाला ग्रामसभा घेऊन किती दिवस झाले हो..🤭
26 जानेवारी रोजी मी एका आपल्या ग्रामपंचायत मध्ये असलेल्या व्यक्तीला प्रश्न केला ग्रामसभा कधी आहे.. तर म्हणले आपले प्रशासकीय अधिकारी आजारी आहेत.. म्हणून ग्रामसभा रद्द झाली..? 🫣
गाव विकासापासून खूप लांबवर ठेवलात तुम्ही.. आणि गावच्या नावाखाली खूप भ्रष्टाचार चालू आहे.... 👍
तर मा. तहसीलदार साहेब मी तुम्हाला ही पोस्ट टॅग करत आहेत... थोडंसं बारकाईने लक्ष द्या आमच्या गावाकडे..
आमच्या शेजारी गावचा विकास झाला आणि आमचं गावं जाग्यावर थांबलं आहे...
तुम्ही समाधान शिबिरासाठी येतं असताना तुम्हाला.. तुम्ही करडखेल पाटी वरून गावात येतं असताना तुम्हाला रस्ता दिसला नाही का हो... का सर्वाच्या डोळ्यावर काळा चष्मा लावला होता तुम्ही...😄😡
काय राव शासनाचा निधी गावचा विकास करायच सोडून आपले खिसे भरता तुम्हाला काही कस वाटतं नाही..होय प्रशासकीय अधिकारी बरोबर ना..? 🤨
बरोबरी जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाल्या आपली कधी होणार का नुसते चार कॅमेरे लावून दिखावा करणार. 🙃
घनकचरा कुठं आहे.. गाडी कुठं आहे का झाला सौदा गाडीचा. 😄
मुंशी पार्टी कर्मचारी कुठं आहेत... 🫣
तर गावकरी मंडळी थोडंसं सावधगिरी बाळगा.. आपल्या गावचा विकास खूप खुंटला आहे.. आणि याला जबाबदार कोण आहे कसा आहे.. थोडंसं बारकाईने विचार करावा....
तर मंडळी सदर पोस्टचा कोणी गैरवापर करू नये, किंवा गैर समजू नये ही पोस्ट सरळ मंत्रालयात नगरविकास खात्या मध्ये जात आहे....
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब... तुम्ही आमच्या गावाला एकवेळा अवश्य भेट द्या... 🙏

0 टिप्पणियाँ