Ticker

6/recent/ticker-posts

बारामती पोटनिवडणूक

 










महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक गड निर्माण झाले, अनेक गड कोसळून पडले अनेक गड चडउत्तार पाहिले पण, एक गड असा आहे. जो काळाच्या प्रत्येक संकट काळात ठामपणे उभा आहे. आणि उभाच असेल असा विश्वासच बारामतीकराने दाखविला आहे.

आणि बारामती म्हंटल की,

एक मतदार संघ नाही... एक विचार एक परंपरा, एक नेतृत्व 

साल 1967 हाच इतिहास आहे, आणि तो आपण सर्वांनी एकदा तरी हा इतिहास वाचून बघा..? ✌️

बारामतीचा इतिहास एक निर्णयक क्षण एक धाडसी नेतृत्व एक चाणक्य बाज देशाची तलवार म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली तोच तो चेहरा जे तुमच्या आमच्या मनात तोंडात शब्दात आहे. 😊

तेच ठाम कर्तृत्व शरद गोविंदराव पवार वय फक्त 27☝️

1967,1972,1978,1980,1985,1990,सलग सहा वेळा विजय.. आणि प्रत्येक निवडणुकीत यशस्वी म्हणजे बारामतीचा अढळ विश्वासचं हो.. ✌️

प्रत्येक निवडणुक म्हणजे वाढत वर्चस्व प्रत्येक बारामतीच्या मातीतून उभा असलेला दूरदृष्टीचा पैलवान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. ✌️

देशाच्या राजकारणात प्रभाव टाकणारा नेता बनला. ☝️

🤘 आणि बारामतीत झाला दुसरा अध्याय सुरु ☝️

अजित अनंतराव पवार.!

1991 ची पोटनिवडणूक आणि विजयाचा पायाच रोवला 

1995,1999,2004,2009,2014,2019,2024..

सलग विजयाची मालिका.! धडाकेबाज निर्भीड नेता 

आठ वेळा आमदार..

सहा वेळा उपमुख्यमंत्री ही केवळ आकडेवारी नाही.

ही आहे जनतेची निष्ठा, हा आहे कामावरचा विश्वास.. 😊

बारामती सिंचन प्रकल्प उभे राहिले औधैगिक क्षेत्राची वाढ झाली.

रस्ते, पाणी, शिक्षण, प्रत्येक क्षेत्रात कामाचा ठसा उमटला.

2014,आणि 2019 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी दणदणीत विजय ✌️ ही केवळ लोकप्रियत्ता नव्हती. हा होता जनतेचा स्पष्ट संदेश..

तर बारामतीकरानी कामकरणाऱ्याला दिलेली पावती होती..

पण प्रत्येक यशस्वी प्रवासाला एक भावनिक विराम असतोचं..🥹

दादाच्या निधनानंतर बारामतीकरांनी एक नेता नाही तर एक युग गमावला. 🥹

गावागावातुन उमटलेली शोकभावना, कार्यकरत्याच्या डोळ्यातील अश्रू.. आणि विकासाच्या वेग देणाऱ्या नेत्याची अचानक झालेली अनपस्थिती..!!!

यामुळे बारामती आजही भावनिक आहे.. 🥹

आणि याच विचारावर आता बारामतीत पोटनिवडणूक होते..

ही केवळ निवडणुकीचा प्रश्न नाही तर, भावनांचा विश्वासाचा खेळ आहे.. आणि सगळ्यांच्या तोंडात एकच नाव पुढे आलं.. 

सुनेत्रा अजित पवार!!!

पवार घराण्यातील परंपरा शरद पवार यांच्या दूरदृष्टीचा वारसा आणि अजित दादाची विकासाची छाप..

हे सर्व पुढे नेण्याची जबाबदारीं सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर येऊन ठेपली..

हा केवळ राजकीय निर्णय नाही तर, पुढच्या अध्याय होय.. 🤘
आज बारामती समोर एक सर्वात मोठा प्रश्न ठामपणे उभा आहे...
ज्या नेत्याने आयुष्यभर विकासासाठी झटले, ज्यांनी बारामती घडवली... त्यांना खरी आदरांजली द्यायची असेल तर..
ही निवडणुक बिनविरोध व्हावी..

हीच बारामतीच्या यशाची गुरुकिल्ली ठरेलं.

कारण हीच खरी दादाला आदरांजली ठरेल...

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ