Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर तालुक्याला कलंक

 🚨 उदगीर पोलिसांचा काळा चेहरा उघडा! लाचेच्या पैशात न्याय विकणाऱ्यांचा पर्दाफाश 🚨

अर्रर्रर्र पुजारी असं कस रे बाबा..

दिल मांगे मोर 🤔

लातूर (उदगीर) : “कायद्याचे रक्षक” म्हणून ओळख असलेल्या पोलिस खात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना उदगीरमध्ये उघडकीस आली आहे. आरोपींना वाचवण्यासाठी थेट लाखोंची लाच मागणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीला अटक टाळण्यासाठी आणि तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात तब्बल 3 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. ही मागणी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सांगण्यावरून पोलीस हवालदार राहुल नागरगोजे यांनी केली होती.


तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पडताळणीत लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. अखेर उदगीर येथील पंचवटी हॉटेलमध्ये आरोपी राहुल नागरगोजे याने 45 हजार रुपये लाच स्वीकारताच ACB च्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.


धक्कादायक बाब म्हणजे, लाच घेतल्यानंतर नागरगोजेने थेट निरीक्षक पुजारी यांना फोन करून “भेट झाली” अशी माहिती दिली. त्यानंतर पुजारी यांनीही फोनवरून “पाठवून द्या, मदत करता येईल” असे म्हणत लाच व्यवहाराला दुजोरा दिला. म्हणजेच, संपूर्ण व्यवहार हा संगनमताने चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


कारवाईदरम्यान आरोपींकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या घरांची झडतीही सुरू आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


🔥 जनतेचा संताप उसळला!


या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “ज्यांच्याकडे न्याय मागायला जायचं, तेच जर पैशासाठी गुन्हेगारांना वाचवत असतील, तर सामान्य माणसाने विश्वास ठेवायचा कुणावर?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.


⚡ पोलिस खात्याची अब्रू धुळीस!


एका बाजूला प्रामाणिक अधिकारी जीव धोक्यात घालून काम करत असताना, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलिस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे.


‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला हरताळ फासणाऱ्या या प्रकारामुळे पोलिसांच्या इज्जतीचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत.


👉 आता प्रश्न एकच — अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फक्त कारवाई पुरेशी आहे का, की कायमची सेवा समाप्ती करून कडक शिक्षा देणार 


#देवेंद्रगंगाधररावफडणवीस_मुख्यमंत्री_महाराष्ट्र #मनिषापाटणकर_म्हैसकर_अपरमुख्यसचिव_गृहविभाग_महाराष्ट्रशासन #सदानंदवसंतदाते_पोलीसमहासंचालक_महाराष्ट्र #वीरेंद्रनाथमिश्र_विशेषपोलीसमहानिरीक्षक_छत्रपतीसंभाजीनगर #अमोलतांबे_पोलीसअधीक्षक_लातूर #लाचलुचपतप्रतिबंधकविभाग #उदगीरपोलीसस्टेशन #पोलीसनिरीक्षक_राजकुमारपुजारी #पोलीसहवालदार_राहूलनागरगोजे #

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ