Ticker

6/recent/ticker-posts

अशोक खरात -रुपाली चाकनकर संबंध का्य.?

 




भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या खात्यातून कोट्यवधींच्या व्यवहारांची धक्कादायक माहिती उघड....?

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये आपल्या बेकायदेशीर आणि भयंकर गुन्हेगारी कारवायांमुळे कुप्रसिद्ध असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. भक्तांच्या अगतिकतेचा आणि धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन संपत्ती गोळा करणाऱ्या या केवळ दहावी नापास असलेल्या भोंदूबाबाने शेकडो कोटी रुपयांची अफाट बेहिशोबी मालमत्ता कशी मिळवली, याचा सखोल तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या तपासादरम्यान महिला आयोग च्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या निकटवर्तीय आणि सख्खी बहीण असलेल्या प्रतिभा चाकणकर यांचे नाव या संपूर्ण प्रकरणात ओढले गेले आहे.

पोलिसांच्या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, 

अशोक खरात याने आपल्या जवळच्या अनेक परिचयातील व्यक्तींचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जमा करून अनेक गैरव्यवहार केले आहेत. तो जगदंब पतसंस्था आणि समता पतसंस्था या बँकांमधील शेकडो बँक खात्यांमध्ये स्वतः वारसदार (नॉमिनी) म्हणून अधिकृतपणे नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, याच पतसंस्थांमध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण आणि सख्खी जाऊबाई असलेल्या प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावे बँक खाते असल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या बँक खात्यातून तब्बल ४० ते ५० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुपाली चाकणकर यांनी याआधीच स्पष्ट केले होते की, या भोंदूबाबाशी त्यांचे कोणतेही वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहार झालेले नाहीत. मात्र, आता त्यांच्याच बहिणीच्या खात्यातून झालेले हे मोठे व्यवहार तपासाला नवीन दिशा देत आहेत.

अशोक खरात याचा व्यावसायिक भागीदार असलेल्या नामकर्ण आवारे याच्या मालकीची जगदंब पतसंस्था आहे,

 तर समता पतसंस्था ही अहिल्यानगर मधील स्थानिक संस्था आहे. या दोन्ही पतसंस्थांमधून अशोक खरात याने स्वतः १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार हाताळले आहेत. सर्वात आश्चर्याची आणि संशयास्पद बाब म्हणजे, या सर्व शेकडो खात्यांना स्वतः अशोक खरात याचाच मोबाईल क्रमांक लिंक केलेला होता. या गंभीर प्रकारामुळे आता या दोन्ही पतसंस्थेचे चेअरमन आणि मॅनेजर यांची विशेष पोलीस पथक कडून अतिशय कसून चौकशी केली जात आहे.

एका गुन्ह्यात अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तो सध्या पोलीस कोठडी मध्ये आहे. गेल्या १३ दिवस पासून विशेष पोलीस पथक या आरोपीची सखोल चौकशी करत आहे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, जादूटोणा, आर्थिक फसवणूक, दमदाटी करून धमकावणे, श्रद्धेच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळणे आणि दहशतीच्या जोरावर जमिनी बळकावणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर बाजू मांडण्यासाठी प्रतिभा चाकणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही. रुपाली चाकणकर राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांच्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या प्रतिभा चाकणकर या सांभाळतात आणि सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असतो.


पत्रकाराचे मत:

समाजात श्रद्धेच्या नावाखाली चालणारे हे आर्थिक आणि मानसिक शोषण अत्यंत चिंताजनक आहे. एका भोंदूबाबाने इतकी मोठी आर्थिक माया जमवणे हे यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या प्रकरणात राजकीय व्यक्तींच्या निकटवर्तीयांची नावे समोर आल्याने, या प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे स्पष्ट होते. प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व सत्य जनतेसमोर आणणे गरजेचे आहे.


⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की मेसेज मध्ये संपर्क साधा ! 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ