Ticker

6/recent/ticker-posts

अजितदादाचा घात की घातपात ?


 रोहित पवारांचं प्रेझेंटेशन ऐकलं…👂

आणि डोक शांत ठेवून मन सुन्न करणारे शब्द 

नाही उगाच आरडाओरडा, नाही फालतू आरोप.

जे बोलायचं ते सरळ-सरळ.स्पष्टपणे 

प्रश्न असे विचारले की अंगाला काटा येईल.

सगळ्यात मोलाचा प्रश्न एकच —

चौकशी कोण करणार?😑

CID? अरे देवा…

आपल्याकडं CID चौकशी म्हणजे 

“तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो” एवढंच!

म्हणून मागणी साफ होती —

परदेशी, त्रयस्थ एजन्सीची चौकशी हवी.

कारण इथं चौकशी करणारेच अर्धे दलाल,

उरलेले दबावाखाली.

मग सत्य बाहेर यायचं कसं?

पवार कुटुंबानं विमानात मरण पावलेल्या सगळ्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

मदतीचा हात पुढं केला.

पण मुख्य पायलट सुमीत कपूर यांच्या घरी नाही.

याचा अर्थ साधा आहे…

बोट कुणाकडं आहे ते कळतंय.

आज ते मुद्देही उघडपणे मांडले.

आता कोणी म्हणेल,

“पायलटच्या कुटुंबाला त्रास होईल.”

पण पवार कुटुंबालाही त्रास झालाय ना?

त्यांचाही माणूस गेला आहे.

मग प्रश्न विचारायचा हक्क फक्त त्यानाच का?

निदान एकजण तरी पुढं येऊन

“खरं काय?” असं विचारतोय.

हेच आज समाधान वाटतंय.

घातपात असेल, नसेल —

पण चौकशी तर झालीच पाहिजे.

नाहीतर आजचा अपघात उद्या सवय होईल.

प्रत्येक मरण “अपघात” म्हणून गाडलं जाईल.

आज विमान, उद्या ट्रेन, परवा पूल…

मग दोन दिवस हळहळ,

चार फोटो, एक कार्यक्रम,

आणि विषय संपला!

इथं ना सत्ताधारी दूधखुळं आहेत,

ना विरोधक साधू.

सगळ्यांचेच हात दगडाखाली आहेत.

म्हणूनच हे बोलणं गरजेचं होतं.

आज रोहित पवार बोलले,

उद्या ही मागणी लावून धरली नाही

तर सगळं पाण्यात!

कारण इथं सत्य बाहेर यायला नाही,

तर दाबायला सिस्टीम तयार आहे! 










एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ