डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही… 😢 नक्कीच वाचून तर पहा
बारामतीला अजित पवार यांचा जनता दरबार भरला होता.😊
सकाळपासून लोकांची लांबलचक रांग…
कोणी अर्ज घेऊन आले होते,
तर कोणी मनातलं दुःख.
दादा समोर बसले होते.
जे काम होणार — ते लगेच करून टाकायचे.
जे शक्य नाही — ते तोंडावर सांगायचे.
ना खोटी आश्वासनं,
ना फसवणूक.✋
तेवढ्यात एक म्हातारी बाई आली…
अगदी खचलेली.
अंगात त्राण नाही.
डोळ्यांत फक्त पाणी.
बोलायला लागली…
आणि अश्रू थांबेचना.
😢
ती म्हणाली
“मला पैशांची गरज होती.
दोन गुंठे जमीन विकायची होती.
गावातले काही दलाल भेटले.
‘आम्ही सगळं बघतो’ म्हणाले.
मी अशिक्षित… भाबडी.
त्यांच्यावर विश्वास ठेवला.
पण त्या हरामखोरांनी
दोन गुंठ्यांऐवजी
दोन एकर जमीन
आपल्या नावावर करून घेतली…”
त्या दोन एकरातच
तिचं घर होतं…
आयुष्याचा आधार.
आणि एक दिवस
तेच लोक
तिला घराबाहेर हुसकावायला आले.
ती हात जोडून रडत होती
“मी फक्त दोन गुंठे विकले आहेत हो…
मला वाचवा…”
पण सातबारा पाहिला
आणि तिचं नावच गायब!
कोर्टात गेली…
वकिलांकडे गेली…
सगळ्यांनी हात वर केले.
“बाई, कागद कायदेशीर आहेत.
पैसे घेतल्याचे पुरावे आहेत.
सुप्रीम कोर्टात गेलीस
तरी न्याय मिळणार नाही…”
आयुष्यात उरलेली शेवटची कमाईसुद्धा
हातातून जाणार होती…
ती बिचारी
तिथेच मटकन खाली बसली.
डोक्याला हात लावून
फक्त रडत राहिली.
तेवढ्यात एक वकील म्हणाला
“कोर्टात नाही…
पण अजितदादांच्या जनता दरबारात जा.
मला वाटतं,
तिथं तुला न्याय मिळेल.”
ती शेवटची आशा घेऊन
दादांकडे आली.
आपली हकिगत सांगितली.
दादांनी लगेच पोलिसांना सांगितलं
“त्या दलालांना बोलवा.”
दलाल आले…
आणि म्हणू लागले
“म्हातारी खोटं बोलते.”
पण दादांनी
एका नजरेतच
सगळं ओळखलं…
म्हातारीचा निष्पाप चेहरा
आणि दलालांची चलाखी.
दादांचा आवाज खर्जात गेला
“सात दिवसांत ही संपूर्ण जमीन
म्हातारीच्या नावावर परत केली नाही,
तर माझ्याशी गाठ आहे…!”
बस्स.
एक शब्दही नाही.
सात दिवसांत कागद फिरले…
जमीन परत मिळाली.
सात दिवसांनी
ती म्हातारी पुन्हा आली…
या वेळी
डोळ्यांत दुःख नव्हतं,
फक्त आनंदाश्रू होते. 🙏
दादा हसून म्हणाले —
“काम झालं ना?
मग आता कशाला आलीस?
दुसरं काही काम असेल
तर लवकर सांग…
माझ्यासमोर अजून मोठी गर्दी आहे.”
ना कौतुक…
ना गाजावाजा…
फक्त काम
आणि पुढचं काम.
कोर्टात न मिळालेला न्याय
दादांनी ताकदीने मिळवून दिला.
आज असं
तात्काळ न्याय देणारं ते
“कोर्ट”च हरवून बसलं आहे…
पुन्हा असा नेता मिळेल का रे बाबा…?
Miss you Dada 🙏

0 टिप्पणियाँ