😊 मैत्रीपलिकडे दादा 😊
महाराष्ट्राचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य अजूनही धक्क्यातून सावरलेले नाही. याच पार्श्वभूमीवर सातारा गादीचे वारसदार आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला २४ फेब्रुवारी २०२६ रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा अत्यंत भावूक निर्णय घेतला आहे.
"महाविद्यालयीन जीवनात आमची ओळख झाली आणि त्याचं मैत्रीत कधी रूपांतर झालं ते कळलंच नाही. दादा अतिशय दिलदार मनाचे माणूस होते," अशा शब्दांत राजेंनी आठवणींना उजाळा दिला.
मित्रा अशी अचानक जाणं मनाला चटका लावून जाणारं आहे. महाराष्ट्र अजून या दुःखातून बाहेर आलेला नाही, अशा परिस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष करणे मनाला पटणारे नाही, असे राजेंनी स्पष्ट केले.
मित्राची अशी अचानक जाणं मनाला चटका लावून जाणारं आहे. महाराष्ट्र अजून या दुःखातून बाहेर आलेला नाही, अशा परिस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष करणे मनाला पटणारे नाही, असे राजेंनी स्पष्ट केले.
"माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा चाहत्याने माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम करू नये, तसेच कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी किंवा गाजावाजा करू नये," असे कळकळीचे आवाहन उदयनराजेंनी केले आहे.
कोणाला काही करायचे असल्यास ती समाजसेवा म्हणून करावी, पण त्याला वाढदिवसाचे निमित्त जोडू नये, अशी त्यांची इच्छा आहे.
राजकीय पटलावर या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा वैयक्तिक आणि वैचारिक मतभेद पाहायला मिळाले, पण उदयनराजेंच्या या निर्णयाने हे सिद्ध केले की, "मैत्रीचे ऋणानुबंध हे कोणत्याही राजकारणापेक्षा श्रेष्ठ असतात."

0 टिप्पणियाँ