खुळी कल्पना खरी वाटू लागते तेव्हा...
आज अजित पवारांचा विषय गावा-गावात पेटलाय. पारावर बसलेली माणसं रात्र कधी सरते आणि दिवस कधी उजाडतो, हेच कळेनासं होतंय. चर्चेचा केंद्रबिंदू एकच-दादा अपघातात गेले की त्यांचा घातपात झाला?
कोणी म्हणतं, "शरद पवारांनी अंतिम मान्य केलं म्हणजे अपघातच असेल." तर कोणी बेधडकपणे म्हणतं, "नाही रे, दादांचा गेम केला."
कल्पना शेवटी कल्पनाच असतात- हे मान्य. पण इतिहास सांगतो, कधी कधी ह्याच कल्पना वास्तवात उतरतात.
मग प्रश्न उभे राहतात-असं झालं असेल का? तसं का झालं नाही? मग हे सगळं असंच का घडलं?
एक कल्पना जन्माला आली... आणि दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली.
मिटकरी अक्षरशः रडत होते. मीडिया ते दाखवत होती. दिवस मावळेपर्यंत त्यांच्या शर्टच्या दोन-तीन गुंड्या निघाल्या. दुःखात माणूस बरंच काही बोलतो ते साहजिक आहे.
पण त्यांनी जे बोललं, ते लोकांना खरं वाटू लागलं.
"ही दादांची बॉडी नाही... दुसऱ्याची बॉडी आणून ठेवली आहे."
आता प्रश्नांचा पूर उसळला-
खरंच ती दादांचीच बॉडी होती का?
होती तर चेहऱ्याचा एकही फोटो पुढे का आला नाही?
इतक्या मोठ्या अपघातात एकही बॉडी ओळखू येत नाही, हे कसं शक्य?
सर्वसामान्यांच्या बॉडीचे फोटो बाहेर येतात, मग इथे का नाही?
विमान पूर्ण जळालं म्हणतात, पण बाजूला शर्ट आणि खुर्ची कशी शाबूत ?
दादा खरंच त्या विमानात होते का?
पोलीस लोकांना विमानाजवळ जाऊ का देत नव्हते?
मुंबई विमानतळावरील त्या वेळचं CCTV कुठं आहे?
दादा कोणत्या गाडीतून आले, ड्रायव्हर कोण होता तो पुढे का आला नाही?
घराबाहेर पडतानाचं, बंगल्याचं CCTV कुठं गेलं?
संपूर्ण विमानतळ CCTV मध्ये आहे, मग दादा कुठेच कसे दिसत नाहीत?
त्या सकाळपासून दादांचं अस्तित्वच जणू गायब झालंय.
यातच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतात -ताईंचे हावभाव चर्चेत येतात. इतका मोठा नेता गेला, आणि सीटिंग अरेंजमेंटचं नियोजन? दुःख कुठं दिसत नाही?
तीन दिवसांचा सरकारी दुखवटा-पण मंत्रिपदाच्या शपथेची घाई? साहेब दुसऱ्याच दिवशी नदीची पाहणी करतात? गुप्त मिटिंगचा व्हिडीओ समोर येतो, आणि दादा गटातून फक्त काहीच चेहरे ?
हे सगळं योगायोग आहे का?
तीन दिवसांत अशी परिस्थिती निर्माण झाली, जणू दादा गेलेत - वर्षभर झालंय.
राजेश टोपेंसारख्या नेत्यांनी अपघाताची वेळ चुकवणं, नाराजी नाट्य, शपथविधीच्या चर्चा-या सगळ्यांनी कल्पनेला अधिकच खतपाणी घातलं.
आज लोक म्हणतात-"दादा कुठून तरी परत येतील...
आणि म्हणतील. मी त्यात नव्हतोच रे..."
हे सगळं भोळेपणातून नाही. कारण तपासात गती नाही. ठोस पुरावे नाहीत. फक्त एवढंच सांगितलं जातं-घडलंय, विश्वास ठेवा... प्रश्न विचारू नका.
एवढ्या आधुनिक काळातही काळोख दाटलाय.
म्हणूनच -मिटकरींची 'खुळी कल्पना' ही तपासात घ्यावी लागेल. त्या दिवशी दादांचं अस्तित्व नेमकं कुठं होतं, याचा शोध घ्यावाच लागेल.
कारण कधी कधी खुळी कल्पनाच सत्याकडे नेणारा मोठा धागा ठरते.
0 टिप्पणियाँ