Ticker

6/recent/ticker-posts

करडखेल आणि भ्रष्ट कारभार karadakhel

🙏नमस्कार 🚩 जय महाराष्ट्र 🚩

करडखेल kardakhel ता. Udgir Dist. Latur 413517

करडखेल गांव हे मुख्य चौरस्त्यावर आहे.

आणि या गावची परिस्थिती पाहता लाज वाटण्याजोगी आहे. आमच्या गावात असा भ्रष्टाचार चालतो तो भारतामध्ये कुठेच आढळून येणार नाही..

आजवर आमच्या गावच्या विकासाच्या नावाखाली फक्त शासनाचा पैसा घेऊन स्वतःची पोटभरनी चालू आहे.. आमच्या करडखेल kardakhel गावाला वारस नाही मी स्पष्ट उल्लेख करतोय,

सत्याची दुरावस्था बगा काय रस्ता आहे, गावातील नाली तर विषयच सोडा, गटारी पूर्ण तुंबून बाहेर घाण पडत आहे, तरी आमच्या गावचा ग्रामसेवक लक्ष देत नाही.. मग या पदावर राहून काय फायदा ग्रामसेवकांचा..? 

3 दिवस झालं मातंग समाजामध्ये पाण्याचा प्रश्न उभा आहे. याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही..

जरी पाणी आलं तर त्या पाण्याची स्वच्छता काहीच नाही मग आम्ही पाणी पिण्यासाठी कोणतं वापरायचं हा प्रश्न कायमस्वरूपी आमच्यापुढे उभा आहे...

तहसीलदार साहेब आपण आमच्या गावामध्ये समाधान शिबिराला उपस्थित होतात, आपणाला आमच्या गावचा रस्ता दिसलाच नाही का हो..? 

आमच्या आजूबाजूच्या गावचा विकास बगा मग करडखेलचं का मागे रहात आहे हो.. या गावच्या विकासाला कारणीभूत कोण आहे.. आम्हाला तुम्ही स्पष्ट मराठी भाषेत उत्तर द्या.?

जलजीवन आमच्या गावाला लाभले पण त्याचा कसा आणि कुठे वापर होतोय. याच काहीच भान नाही हो कुणाला ना वेळेवर आजवर पाणी आलं ना शुद्ध पाणी आलं...

रस्त्यावर जे लाईटचे दिवे आहेत ते फक्त 1 महिना चालतात बंद पडतात.. त्याकडे कोणी लक्ष देत नाही, हे लोक फक्त गावच्या नावाखाली आपली खिसे भरतात, घरकुलयोजनेच्या नावाखाली किती भ्रष्टाचार आपणाला दिसून येईल.. हे आपल्या शब्दात सांगण्यायोग्य अजिबात नाही...

मा. जिल्हाधिकारी साहेब तुम्ही तर या करडखेल गावची दखल घेऊन आम्हा गावाकरी मंडळींना मोकळा श्वास घेऊ द्या...

ना आमच्या समशान भूमीची प्रश्न सुटला ना रस्त्याचा ना पाण्याचा, ते फिल्टर मशीन आणुन लावले पण त्या डब्याला कोणी बगायला सुद्धा तयार नाही हो... फक्त हे लोक शासनाचा निधी उचलून आपली स्वप्न पूर्ण करत आरामदायी जीवन जगतात..

आणि मग राहिला प्रश्न जनतेचा पण जनतेकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही... मग लुचे आणि बेशरम लोक आमच्या गावाला का म्हणून दिलात.? 

मा. मुख्यमंत्री वं उपमुख्यमंत्री साहेब,

Karadakhel करडखेल गावची परिस्थिती तुम्ही स्वतः गावात येऊन निरीक्षण करा.. 🙏

मग आपणाला दिसून येईल गावामध्ये काय भ्रष्टाचार चालाय ते.

उन्हाळा, पावसाळा, हिव्हाळा या तिन्ही ऋतू म्हणजे 12 महिने आम्हाला त्रास आहे.. तुम्ही आमच्या गावाकडे लक्ष द्या... मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये फोटो व्हिडिओ क्लिप तयार करून आपल्या नगरविकास खात्याकडे सोपवीन... 👍

तूर्तास इथेच थांबतो. 🚩जय महाराष्ट्र 🚩

दयानंद कसबे.. ( D. k. )

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ