Ticker

6/recent/ticker-posts

शरद पवार .. कौटिल्य

 



💢"म्हातारं लागलं अभ्यास करायला"!!!💢


काल एका मित्राचा उशिरा फोन आला. बोलणं झाल्यावर मी शेवटी विचारलं, “दादा आणि आई कसे आहेत?” तो म्हणाला, “हे काय, दादा इथेच आहेत, बोल...”


या दादांचा विषय असा की, हे पवार साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कधी माझा फोन झाला की ते आवर्जून पवार साहेबांविषयी थोडंतरी बोलतातच. मित्राने त्यांच्याकडे फोन देताच मी म्हटलं, “झाले बरं का, पवार साहेब खासदार... बिनविरोध गेले राज्यसभेवर...” लगेच ते म्हणाले, “ते तर जाणारच, कोण अडवतं साहेबाला...” मी म्हटलं, “नाही, मतदान झालं असतं तर मग थोडं अवघड होतं...” तसं ते लगेच म्हणाले, “काय अवघड नव्हतं... आपाप बटणं दाबली असती सगळ्यांनी... एवढं सोपं आहे का साहेबाला विरोध करायला?”

“हो, बरोबर आहे. पण दादा गेल्यामुळे थोडे शांत झालेत... दवाखान्यात आहेत महिनाभर...” हे बोलल्यावर ते थोडं ओरडून, पण उत्साहातच बोलले,


🔥 “शाब्बास पठ्ठे... फुटू पाहिला नाही का... सकाळीच दाखवला पोरांनी... चांगलं निबार आहे म्हातारं अजून... आता घरी आहे... चांगलं अभ्यास करायला लागलंय... ते काय ऐकातय होय?”🔥


सांगायचा उद्देश असा की, शरद पवार हा विषय महाराष्ट्राच्या जनमानसावर किती खोलवर कोरला गेलेला आहे, हे यातून दिसून येतं. मागील काही दिवसांपासून पवार साहेब आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये होते. अजूनही मीडियासमोर आले नाहीत. आणि हा जो फोटो आहे, तो मीसुद्धा फोन झाल्यावर पाहिला. त्या मित्राने सांगितलं की, रोज संध्याकाळी बातम्या लागल्या की दादा विचारतात, “पवार साहेबांचं काही दाखवलं का रे?”

मग आज हा फोटो प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी फेसबुकवर टाकला, तो त्यांना सकाळी दाखवला. 

     आणि हे असं प्रेम फक्त पवार साहेबांनाच भेटू शकतं, कारण ते खऱ्या अर्थाने जाणते नेते आहेत.


पवार साहेब राज्यसभेवर जाण्याअगोदर अनेक जण वेगवेगळ्या अटकळी बांधत होते. ते राज्यसभेवर गेल्यावरदेखील अनेक तिनपाट पत्रकार, विश्लेषक, अंधभक्त म्हणत होते की, “आता थांबायला पाहिजे” वगैरे. पण जनता पवार साहेबांना दिल्लीत पाहून खूश आहे. आणि पवार साहेब अभ्यासाला लागले म्हणजे आता अनेक विषयांचे प्रश्न मिटणार, सोडवले जाणार, याची जनतेला खात्री आहे.


काही ज्येष्ठ पत्रकार, अगदी पुरोगामी विचारधारा मानणारेदेखील, “पवारांनी थांबलं पाहिजे होतं,” असे कयास बांधायला लागले. पण इतकी वर्षं पवारांना अधोरेखित करतानाही त्यांना साहेब समजलेच नाहीत, किंवा त्यांना समजून घ्यायचंच नाही, असंच दिसतंय. ते नेहमी पवारांना समजून घेताना वय आणि त्यांच्या पक्षातील आमदार-खासदार यांची संख्या हेच पॅरामीटर लावून पाहतात. पण पवार साहेबांची उंची ही त्यांचं वय आणि किती आमदार-खासदार आहेत यावर ठरत नाही.

एका रिक्षात बसतील इतक्या खासदारांवर त्यांनी अनेक सरकार वाकवली आहेत. पक्ष फुटला, पत्रकारांनी विचारलं, “आता किती सदस्य आहेत तुमच्याकडे?” त्यांनी एका सेकंदात सांगितलं, “शून्य.” त्यांनी कधी खासदार-आमदारांची संख्या गृहीत धरली नाही. पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा आणि जनतेच्या मनातील राजकारण या दोनच गोष्टींवर ते देशातील एकमेव असे नेते आहेत, जे सलग एकही निवडणूक न हारता ६० वर्षं संसदीय राजकारणात सक्रिय आहेत.


आणि आता अभ्यास करताना पाहून जनता मात्र खुश आहेत कारण त्यांचे प्रश्न सोडवणारा जाणता नेता आता पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे!!!


पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.🛡️🛡️

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ