गावात राहणाऱ्या 10 वी नापास खरातने 18 तास अभ्यास करुन झालेल्या अधिकाऱ्यांकडून, उद्याेगपतींकडून आणि महाराष्ट्राच्या भाग्यविधात्या मंत्र्यांकडून पैसे उकळण्यासाठी कोणता पॅटर्न वापरला?
भाग १ - उद्योगपती
खरातने एका आमदाराच्या पुतणीची सेटिंग एका उद्योगपतीसोबत लावली.
दोघांचे सर्व सुरळीत सुरू असताना एक दिवस त्या तरुणीला खरातने एक सल्ला दिला, तो सल्ला असा - त्या उद्योगपतीला सांगायचं, मी गर्भवती आहे.
तरुणीने खरातच्या सांगण्यावरून ते केलं...
तो उद्योगपती खरातकडे आला, खरातने आता त्याला सल्ला दिला, तो सल्ला असा - त्या तरुणीला 20 कोटी रुपये देऊन प्रकरण मिटवून टाक.
त्याने 20 कोटी दिले सुद्धा, पुढे तो उद्योगपती आणि ती तरुणी भेटले तेव्हा त्या तरुणीने खरातनेच तिला खोटं बोलायला लावल्याचं सांगितलं तेव्हा उद्योगपतीला आपल्याला चुना लागल्याचं कळलं.
आता प्रश्न असा - त्या उद्योगपतीने एका झटक्यात 20 कोटी दिले, त्याने हे पैसे त्याच्या व्यवसायातून उभारले असतील पण मंत्री, आमदार यांनी किती पैसे दिले? त्यांनी जनतेच्या पैशातले पैसे दिले की स्वतःच्या खिशातले? हे लोकांसमोर येणार आहे की नाही?
ज्या ज्या मंत्र्यांचे फोटो त्या खरातसोबत आले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी व्हायला हवी.
चाकणकरांचा राजीनामा घेतला म्हणून फुशारक्या मारणे थांबवा. तुमचे बरबटलेले हात दीड दमडीच्या ट्विटर पोस्टने स्वच्छ होतील या गैरसमजातून बाहेर या.
ज्या खरातसोबत चाकणकरांचे फोटो आहेत त्याच खरातसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे फोटो आहेत.
त्यामुळे अशोक खरातला अटक झाली (जी अपरिहार्य बाब आहे) म्हणून कायदा आणि सुव्यवस्था किती चांगली आहे यासाठी एकसारखे थर्ड क्लास ट्विट करून Cheap PR थांबवा. हिम्मत असेल तर महाराष्ट्रासमोर येऊन माफी मागा. चौकशीला सामोरे जा. बाबाच्या नादी लागून आम्ही शेण खाल्लं (मूत्र पिलो असं वाचा) हे जाहीरपणे महाराष्ट्राला सांगावं....
राजकारण हे खरात च्या सभोवताली फिरते का ?

0 टिप्पणियाँ